अनादि मी अनंत मी अवध्य मी भला
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ॥धृ॥
अट्टहास करित जई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणी
अग्नी जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिऊनि मला भ्याड मृत्यु पळत सूट्तो
खुळाऽरिपूऽ । तया स्वये
मृत्युच्याचि भितिने भिववु मजसि ये ॥ १ ॥ ॥धृ॥
लोटि हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भवति रचिल शित सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाऽहलाऽ । त्रिनेत्र तो
मी तुम्हासि तैसाची गिळुनि जिरवितो ! ॥ २ ॥ ॥धृ॥
खूप भारी कविता ......
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment